स्वामी माधवनाथ
प्रपंची जो सावधान। तो परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।। (दासबोध)
स्वामी मकरंदनाथ
प्रपंच व परमार्थ हि जीवनाची दोन अंगे नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संसार टाकून परमार्थ करण्यापेक्षा सगळा संसारच मोक्षरूप व्हावा अशीच संतांची इच्छा आहे. अशा प्रकारे प्रपंच परमार्थरूप करण्याचा मार्ग ज्या साधकाला सापडला त्याचेच जीवन धन्य - स्वामी माधवनाथ
साधक कोणाला म्हणावं ?
- आपल्या वाट्याला आलेली कर्मे अत्यंत चोख प्रामाणिकपणे ईश्वरसेवा समजून मोठया प्रेमाने, निष्ठेने, निःस्वार्थीपणे करणारे
- कुटुंबाची, समाजाची , राष्ट्राची , प्रत्येक प्राणीमात्राची 'आत्मभावाने' सेवा हीच ईश्वरसेवा समजणारे
- संत-सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास ठेऊन सर्वांशी अति प्रेमळ, नम्र, निर्मत्सरी वर्तन करणारे
- कोणत्याही लोभाला, भीतीला, बळी न पडणारे व कोणत्याही प्रसंगात आपल्या ईश्वर निष्ठेला जराही धक्का पोहोचू न देणारे
- हे ची दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा । - असे निरपेक्ष दान भगवंताकडे मागणारे, आनंदासाठी उपासना करणारे
- 'आहे तितुके देवाचे ' असं मानून अलिप्तपणे संसारात वावरणारे ते साधक
पत्ता: 'माया अपार्टमेंट', चिमण बाग सोसायटी, १५७५/बी, सदाशिव पेठ, महाराष्ट्र मंडळा समोर, पुणे, ४११०३०